कसब्यात दाभेकर यांची बंडखोरी, `आप` कडून विजय कुंभार

0
298

पुणे, दि. ७ (पीसीबी) : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसेभेच्या पोटनिवडणुका वेगळ्या वळणावर पोहचल्या आहेत. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठीही इच्छुकांमध्ये मोठी चढाओढ सुरु आहे. भाजप, महाविकास आघाडी यांच्यातील चढाओढीत आम आदमी पार्टी आणि हिंदू महासंघानेही उडी घेतल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीतील रंगत वाढत चालली आहे. आपच्या वतीने माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आपचे प्रदेश समन्वयक विजय कुंभार उमेदवार असणार आहेत.

कसब्यात भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्यामुळे टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी आहे. तर महाविकास आघाडीतून काँग्रेसने रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमधून इच्छुकांची यादी मोठी होती. त्यात काँग्रेसचे जुने सभासद बाळासाहेब दाभेकर इच्छुक होते. धंगेकर यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता दाभेकर यांनीदेखील काँग्रेसमधून बंडखोरी केली आहे. दाभेकरदेखील आज (७ फेब्रुवारी) ते अर्ज दाखल करणार आहेत.