ब्राम्हण समाजावर अन्याय झाला असे म्हणणे चुकीचे – चंद्रकांत पाटील
पुणे , २८ मार्च : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना नुकतेच अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्ष्य केले. त्यापूर्वी कसबा निवडणुकीतील पराभवाबाबत देखील चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरण्यात आले. ब्राम्हण समाजावर अन्याय करण्याचे खापर देखील त्यांच्यावर फोडण्यात आले. परंतु या सर्व आरोपांचे आज चंद्रकांत पाटील यांनी खंडण केले. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आज पाटील यांनी या सर्व विषयांचे स्पष्टीकरण दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी प्रथम अजित पवार यांनी केलेल्या आरोपावर भाष्य केले. ते म्हणाले कि, काहीही झालं कि अंगावर यायचं. सभागृहामध्ये एकदा असं झालं कि १० लक्षवेधी होत्या. आणि त्या १० लक्षवेधी विचाणाऱ्यांपैकी ९ जण तिथे उपस्थितच नव्हते. मग अशावेळी काय करायचं असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. काहीही झालं तरी तुम्हाला कसं चालवता येत नाही, आम्ही कसं चालवायचो असा प्रयन्त अजित पवार करत आहेत. अजित दादा सोडून बाकी कोणाचा प्रॉब्लेम नव्हता. आपल्या श्रेष्ठींकडे मी कसा विरोधी पक्ष नेता म्हणून योग्य आहे असं रजिस्टर करायचा अजित दादांचा प्रयत्न असल्याचे पाटील यांनी म्हटले. ते विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका नीट बजावतात कि नाही, ते बजावत नाहीत असं त्यांच्या श्रेष्ठीना वाटत का?, मी कसा योग्य रीतीने बजावत आहे हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? , असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले. आमच्या पक्षातील कोणीही यामध्ये तेल घालण्याचा प्रयन्त करत आहेत असं मला वाटत नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ पहिल्या दुसऱ्या स्थानावर असणारे चंद्रकांत पाटील यांना यावेळी थोडं दुसऱ्या फळीत ढकलण्यात आल्याची चर्चा होती. याबाबत पाटील म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणासाठी ज्याचा चांगला अनुभव आहे अशा व्यक्तीची निवड करण्याचा केंद्राकडून आदेश होता. मी अनेक सेमिनार आयोजित केले, अनेक सेमिनार अटेंड केले त्यामुळे या विषयाची माहिती खूप मिळाली. शिक्षणाबाबत मला खूप अनुभव होता. त्यासोबतच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्यामुळे संसदीय मंत्री थोडा चांगला असणं गरजेचं आहे. त्यामुळे संसदीय आणि शिक्षणाची जबाबदारी माझ्याकडे आली.
कसब्याच्या पराभवावर देखील पाटील यांनी भाष्य केले. कसब्याचा पराभव हा पराभव नाही. आम्ही कसबा पुन्हा जिंकणारच. आमची ताकद आहे. आमचीही व्होटबँक आहे. विरोधकांची व्होटबँक हि टोटली नेहमीच जास्त राहील. २००९ च उदाहरण घ्या बापटसाहेब आमदार झाले. पराभव हा १० हजार मतांनी झाला. राजकारणाच्या परिभाषेमध्ये अजून ६००० मत असती तर आम्ही १००० मतांनी विजयी झालो असतो. त्यामुळे कसब्यातील हा पराभव हा पराभव नाही . पराभव असेल तर तो उमेदवाराचा नाही. हा पराभव मतांचं विभाजन करण्यामध्ये आम्ही अयशस्वी झालो त्यामुळे झालेला पराभव आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
ब्राम्हण या विषयामध्ये माझ्यावर वारंवार आरोप केला जातो मी ब्राम्हण समाजावर अन्याय केला. पण मी आज याबाबत सांगतो कि माझी बायको स्वतः कोकणस्थ ब्राम्हण आहे. अतिशय प्रेमाचे, एकमेकांना जपण्याचे संबंध असतां मी या समाजावर अन्याय कसा करेन. कोथरूमध्ये मेधाताई कुलकर्णी ऐवजी माझी निवड करण्यात आली. राजकीय समीकरणांसाठी असा आग्रह धरण्यात आला कि तिथे माझी निवड करण्यात आली. कसब्यात देवेंद्र फडणवीस आणि माझं असं ठाम मत होत कि टिळकांच्या घरीच उमेदवारी द्यावी.
तशी परंपरा आहे कि ज्या घरातील माणूस जातो तयच घरात उमेदवारी दिली गेली पाहिजे. आजारपणामुळे मुक्ता ताईचं अस्तित्व हे संपलं होत. त्यांचे पती आणि मुलगा हे दोघेही त्यांच्या सेवेत होते. त्यामुळे सर्व्हेत ते मागे पडले. यावर परस्पर निर्णय न करता देवेंद्रजींनी टिळकवाड्यावर जाऊन त्याच्या घरच्यांशी चर्चा केली. त्यांच्या परवानगीनेच दुसऱ्या उमेदवाराची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ब्राम्हण समाजावर अन्याय झाला असे म्हणणे चुकीचे आहे.