पुणे, दि. ५ (पीसीबी) : भारतीय जनता पक्षाने पुणे शहरातील कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले. उमेदवार देताना टिळक घराण्याला डावललं आहे. त्याऐवजी हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज झाले. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. ब्राम्ह्यण समाजाला प्रतिनिधित्व नसल्याने समाज नाराज होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मग भाजप नेत्यांची धावाधाव सुरु झाली. भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन त्यांच्या घरी गेले. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
पुणे कसबा पेठ येथील भाजप उमेदवारावरुन ब्राम्ह्यण समाजात नाराजी निर्माण झाली आहे. हिंदू महासंघाचे आनंद दवे म्हणाले, भाजपने आधी मेधा कुळकर्णी, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता टिळक कुटुंबीयांना संधी नाकारली. भाजपला काही जातींची मते हवी आहेत.
आम्ही लवकरच कसब्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे ही निवडणूक भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आधी टिळक परिवार नाराज असताना ब्राम्ह्यण समाजाची नाराजी भाजपला परवडणारी नाही. कसबा पेठेतील जातीय समीकरण पाहिलं तर मराठा आणि ओबीसी वर्ग 35 टक्के आहेत. ब्राह्मण समाज 25 ते 30 टक्के, मागासवर्गीय समाज 18 टक्के तर 10 टक्के मुस्लीम समाज आहे. ब्राम्ह्यण समाज भाजपचा मागे नेहमी राहिला. परंतु आता त्याची नाराजी भाजपला दूर करावी लागणा आहे.
कोण आहेत हेमंत रासने? भाजपने उमेदवारी दिलेले हेमंत रासने पुण्यातून 4 वेळा नगरसेवक राहिलेत. पुणे महापालिकेचं स्थायी समितीचे अध्यक्षही होते. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आहेत. भाजपचे खासदार गिरीश बापटांचे निकटवर्तीय आहेत. कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या 28वर्षात 25वर्षे गिरीष बापट आमदार होते. त्यानंतर मुक्ता टिळक आमदार झाल्या.
कसबा मतदारसंघात प्रामुख्यानं येणाऱ्या भागांमध्ये शनिवार वाडा, सोमवार पेठचा काही भाग, नारायण पेठ, सदाशिव पेठ, दांडेकर पूल,मंडईची मुख्य बाजारपेठ, नवी पेठ आणि लोकमान्य नगरचा भाग येतो.