कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिल्ली येथे सुरू केलेल्या आंदोलनाला शहरातून चालकांचा पाठिंबा

0
176

-पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयावर केले आंदोलन

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – देशभरातील 25 कोटी चालकांच्या विविध मागण्यासाठी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे दिल्ली येथे 3 जानेवारी 2024 रोजी जंतर-मंतरवर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकार ने हिट अँड रन कायद्यास विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील ऑटो व ट्रक टेम्पो चालकांनी आंदोलन करून पाठिंबा दिला आहे, पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयावर आंदोलन करत निवेदन देणार आले.

या निवेदनात नमूद केले आहे की, हिट अँड रन प्रकरणी अपघात प्रसंगी ड्रायव्हरला 10 वर्षाची शिक्षा व आर्थिक दंड अशा प्रकारचा कायदा करण्याची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे. या कायद्यामुळे देशभरातील 25 कोटी ऑटो, टॅक्सी, बस, टेम्पो, ट्रक चालक यांचे आयुष्य उध्दवस्त होणार आहे. यामुळे चालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झालेला आहे. हा कायदा मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी तसेच ऑटो, रिक्षा, टॅक्सी, ट्रक, टेम्पो आदी चालकांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करण्यात येत आहे. बाबा कांबळे यांच्या आंदोलनाला पिंपरी चिंचवड शहरातून पाठिंबा देण्यात येत आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयवर आंदोलन करण्यात आले.

अपघात झाल्यास चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि 10 लाख रुपये दंड असा असलेला काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा. देशातील सर्व चालक आणि मालकांसाठी राष्ट्रीय कल्याण मंडळाची स्थापना करावी. त्याद्वारे सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, मुलांना शिक्षणाच्या सुविधा आणि वृद्धापकाळात पेन्शन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीय चालक आयोग स्थापन करावा. सरकारने देशभरात चालक दिन साजरा करावा. दिल्लीत चालकांसाठी राष्ट्रीय स्मारक बांधावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात बाळासाहेब ढवळे, लक्ष्मण शेलार, सोमनाथ कलाटे, संतोष गुंड, शुभम तांदळे,विनायक ढोबळे,हिराराम गवारे,तुषार लोंढे,अजय साळवे,रोहिदास पिंगळे,पप्पु गवारे,अविनाश जोगदंड,दादा किवळे,देवा चव्हाण,घरकाम महिला अध्यक्षा आशाताई कांबळे, मधुरा डांगे,राणीताई तांगडे,अंजली कांबळे,आदी सहभागी झाले होते.