कष्टकऱ्यांची ताकद महाविकास आघाडी सोबत

0
171
  • लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा कष्टकऱ्यांचा निर्धार
  • विभागवार बैठका घेऊन कष्टकऱ्यांची साधणार एकजूट

महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुका होत आहेत या निमित्ताने प्रचार सुरू आहे, मोदी सरकारने कामगार विरोधी केलेले कायदे त्याचबरोबर बेरोजगारी, महागाई यासह असंघटित कामगारांवर अन्याय आणि निराशाजनक कामगिरी असल्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासचा शब्द महाविकास आघाडीने दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचा निर्धार आजच्या सभेत करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, कामगार विभाग आणि असंघटित कामगार विभाग, कष्टकरी संघर्ष महासंघ नॅशनॅलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे आज महविकासाघाडी समर्थन सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष कामगार नेते काशिनाथ नखाते राज्य सचिव तुषार घाटूळे, वाहतूक विभागाचे हनुमंत कसबे, निमंत्रक सुरज देशमाने, संयोजक राजू बिराजदार, महिलध्यक्षा अर्चना कांबळे, अनिता जाधव, राजेश हरगुडे, ओबिसी सेलचे संतोष माळी, रंजना माने,सुनिता पोतदार यांचे सह पुणे जिल्ह्यातील सर्व विभागातील कामगार बांधव उपस्थित होते.

यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की गेल्या दहा वर्षांमध्ये कामगारावरती अन्याय हा भाजपने सरकारने केलेला असून कायम असलेल्या कामगारांना हंगामी करण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, भाजपशासित राज्यांमध्ये कामगारांना कुठल्याही प्रकारचा कामगार कायदा लागू नसल्याने पुन्हा एकदा वेठबिगारीकडे कामगार ढकलले गेले आहेत. असंघटित कामगारांमध्ये अनेक प्रश्न असून केवळ जाहिरातिशिवाय त्यांना काहीही मिळालेले नाही. संघटित – असंघटित कामगारावरती मोठा अन्याय सुरू असून. तळेगाव ची जनरल मोटर्स पद्धतशीर बंद करून कामगारांचे नुकसान केले आहे . कोरोना नंतर १० लाख रोजगार बंद पडलेले आहेत त्यांच्या हातचे काम गेलेले आहे आता हाताला काम मिळत नाही, किमान वेतन मिळत नाही. मनरेगा योजनेला बळ देणे सोडून त्यांचा निधी रोखला जात आहे.

महाराष्ट्र अभिमानासाठी लढणारे शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांचे मार्गदर्शनात सर्व कामगार एकत्र येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० उमेदवारांना विजयी करण्यासह महाविकास आघाडीचे काम राज्यात सुरू आहे. म्हणून सर्व कामगारांनी एकमुखाने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे, संजोग वाघेरे, सुप्रियाताई सुळे, रवींद्र धंगेकर यांचे मतदार संघातील उपलब्ध असणारे चिन्ह तुतारी फुंकणारा माणूस, मशाल आणि हात यांना मत देऊन विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. सर्व कामगारांनी विजयाची खून दाखवून कष्टकरी कामगारानीं मतदार जागृती करण्याचा निर्धार आज केला.