“कविता हा अंतर्मनाशी केलेला संवाद असतो!” -कवी प्रदीप गांधलीकर

0
253

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे कविसंमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

पिंपळे गुरव, दि. २९ (पीसीबी) – काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे या संस्थेच्या वतीने रविवार दिनांक २८ मे २०२३ रोजी अरुण कन्स्ट्रक्शन पिंपळे गुरव, सृष्टी चौक येथे कवी संमेलन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. प्रख्यात कवी, लेखक, गझलकार आणि निवेदक प्रदीप गांधलीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, घनोबा ग्रुप लिमिटेडचे अध्यक्ष सदानंद पाटील, वसुंधरा पर्यावरण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे या संस्थेचे अध्यक्ष आत्माराम हारे यांच्या उपस्थितीत वृक्षपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी प्रदीप गांधलीकर म्हणाले, “आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४०वी जयंती आहे. प्रतिभाशाली साहित्यिक असलेले सावरकर हे महाकवी होते. आपल्या स्वातंत्र्यसमरात कवितेचे स्थान उच्चकोटीचे आहे. कवितेमुळे जगात अनेक ठिकाणी क्रांती घडली आहे. समाजातील विकृती शोधून संस्कृती रुजविण्याचे कार्य कवी करीत असतो. कवितेचे सामर्थ्य अगाध असते!”

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले, “जगाला जागृत करण्याचे काम कवीच करीत असतात!” कवी तानाजी एकोंडे यांनी, “कवींनी जागृत होऊन आपल्या वसुंधरेच्या रक्षणार्थ शब्द प्रपंच करावा!” असे विचार व्यक्त केले.

यावेळी राज्यस्तरीय पुरस्कार हमाल म्हणून काम करणारे फिनोलेक्स कंपनीतील कामगार युवराज खांडेकर यांना श्रमप्रतिष्ठा पुरस्कार प्रदान करून आणि सावित्रीबाई फुले पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या राजलक्ष्मी हेगडे यांचा देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कविसंमेलनात विष्णू वाघ, संभाजी रणसिंग, फुलवती जगताप, डॉ. पी एस आगरवाल, मंगेश हारे, शामराव सरकाळे, नंदकुमार कांबळे, जयश्री गुमास्ते, उमेंद्र बिसेन, गजानन उफाडे, दत्तू ठोकळे, आनंद गायकवाड, प्रज्ञा तगलपल्लेवार, हेमंत जोशी, संतोष गाढवे, लखन जाधव, अशोक वाघमारे, आनंद मुळूक, दादाभाऊ ओव्हाळ, अनिल नाटेकर, आण्णा जोगदंड, विजय जाधव, प्रभू जाचक, उमाकांत भेसके, शोभा जोशी, सुहास घुमरे, नितीन भोसले, सुप्रिया लिमये यांनी सामाजिक अन् देशभक्तिपर कविता सादर केल्या. प्रास्ताविक आत्माराम हारे यांनी केले. सुरेश कंक यांनी सूत्रसंचलन केले. तर आभार संजय साळुंके यांनी मानले.