कलारंग संस्थेच्या वतीने शुक्रवारी सुनील देवधर यांचे व्याख्यान

0
242

पिंपरी,दि.०३(पीसीबी) – कलारंग संस्था पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व भविष्यातील भारत” या विषयावर प्रसिध्द वक्ते सचिव सुनील देवधर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी सकाळी दहा वाजता हे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानासाठी सर्वांना मुक्त प्रवेश आहे. पिंपरी चिंचड शहरातील सर्व युवक, युवती, तसेच नागरिकांनी व्याख्यानासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी केले आहे.

या कार्यक्रमासाठी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, प्रसिध्द अभिनेते राहूल सोलापूरकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी विनोद बन्संल, मुकुंद कुलकर्णी, हेमंत हरहरे, मिलिंद देशपांडे, विनायक थोरात, माहेश्वर मराठे यांची प्रमुख उपस्थिती राहील. तसेच, शहरातील सन्मानीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.