कलाकेंद्र गोळीबारात मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश

0
20

पुणे, दि. २४ पुण्यातील दौंड येथील अंबिका कलाकेंद्रात गोळीबार झाल्याची घटना झाली आहे. एका आमदाराच्या भावानेच हा हवेत गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे गोळीबाराच्या या घटनेत कलाकेंद्रात नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचेही सांगण्यात येत होते. एका आमदाराच्या भावाचे नाव या प्रकरणात आल्यामुळे राज्यभरात त्याची चर्चा झाली. दरम्यान आता याच घटनेविषयीची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या प्रकरणात कोणतीही महिला जखमी झालेली नसल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय. तसेच गोळीबाराच्या घटनेत मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का? याचीही चाचपणी करण्याचा आदेश देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

या प्रकरणात कोणीही जखमी झालेले नाही
अजित पवार माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होती. यावेळी पत्रकारांनी त्यांना दौंडमधील गोळीबार प्रकरणी विचारण्यात आले. यावर बोलताना, दौंडमधील कलाकेंद्रात झालेल्या गोळीबाराप्रकरणी मी तेथील अॅडिशनल एसपीकडून माहिती घेतली. या प्रकरणात चुकीचे वृत्त दिले गेले.एका महिलेला गोळी लागली आणि ती जखमी झाली, असे वृत्त पसरले. मी या प्रकरणी पोलिसांना सांगितले की नीट तपासणी करा, त्या महिलेला एखाद्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे का ते पाहा, असे सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच, पोलिसांनी मला सांगितले की या प्रकरणात कोणीही जखमी झालेले नाही. आम्ही व्यवस्थित माहिती घेतली. तिथे हवेत गोळीबार झाला. हा गोळीबार पाहून तिथे एक महिला बेशुद्ध पडली. त्या महिलेला पाणी वगैरे देऊन शुद्धीवर आणण्यात आले. तिथे कोणलाही कुठलीही जखम झालेली नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा
Kalyan : …म्हणून ‘त्या’ मारणाऱ्या व्यक्तीच्या वहिनीवर हात उचलला, रिसेप्शनिस्ट मुलीचा खळबळजनक खुलासा काय?
Nalasopara Murder : हवा आली अन् ओढणीने केला घोळ, टाईल्स मर्डर केसमध्ये पोलिसांना मोठे यश!
खडसे आणि ‘मोठ्या साहेबांनी’ माझ्या वडिलांना अडकवलं, प्रफुल लोढाच्या मुलाचा खळबळजनक आरोप!
तो मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही
या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, असे मी तेथील पोलिसांना सांगितले आहे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी तशा सूचना दिलेल्या आहेत. या प्रकरणात जी नावे समोर येतील त्यांना अटक करा, असे मी सांगितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच या प्रकरणात भोर वेल्हा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकरांच्या भावाचे नाव घेतले जात आहे. तो मांडेकरांचा सख्खा भाऊ नाही. तो चुलत भाऊ असण्याची शक्यता असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. पुढे बोलताना कोणीही असूद्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.

कोका कायद्याअंतर्गत होणार गुन्हा दाखल?
तसेच या प्रकरणाचा पूर्ण तपास करण्याचा मी आदेश दिला आहे. आरोपींकडे शस्त्र ठेवण्याचा परवाना आहे का? याचाही तपास होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. जमलं तर या प्रकरणात मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करता येतो का, ते पाहण्याच्याही सूचना करण्यात आल्या असल्याची महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे