कर्मचाऱ्यांना तब्बल 62 कोटी रुपयांचे बक्षीस

0
42

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांनी दिवाळीपूर्वी बोनस देण्याची घोषणा केली आहे. या बोनसमध्ये महापालिकेत काम करणारे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सामील असतील ज्यात सेवानिवृत्त, निलंबित किंवा मानधनावर काम करणारे कर्मचारीही येतात.

पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 62 कोटी रुपयांचे बक्षीस रक्कम मिळणार आहे. महापालिकेच्या प्रथा व परंपरेनुसार दिवाळी बोनस म्हणून तब्बल साडेसहा हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना 8.33 टक्के सानुग्रह अनुदान व जादा 20 हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड होणार आहेय

 

बोनसची रक्कम कर्मचार्‍यांच्या पदानुसार
आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सामान्य सानुग्रह अनुदानाशिवाय अतिरिक्त बोनसही जाहीर केला आहे. या बोनसची रक्कम कर्मचार्‍यांच्या पदानुसार ठरवण्यात आली आहे. प्रथम श्रेणीतील अधिकाऱ्यांना अडीच लाख रुपये बोनस मिळणार आहे तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी ही रक्कम चाळीस हजार रुपये आहे.

या बोनसमुळे महापालिकेतील अधिकारी तसेच कर्मचारी आनंदात आहेत कारण त्यांना महिन्याच्या पगारासमान रक्कम बोनस स्वरूपात मिळणार आहे. ही योजना दिवाळीपूर्वीच दिल्यामुळे त्यांच्या उत्सव साजऱ्यासाठी आर्थिक सहाय्य होईल.


पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ व महापालिका आयुक्तांसोबत झालेल्या करारनामानुसार हा दिवाळी बोनस दरवर्षी दिला जातो. त्याबाबत महासंघ व महापालिकेत दर पाच वर्षांसाठी करारनामा केला जातो. मागील सन 2021 पासून हा करारनामा झाला आहे. त्यानुसार, यंदाही हा बोनस दिला जाणार आहे. महापालिकेच्या वर्ग एक ते चारमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे.

महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार
महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार आहे. मात्र, सहा महिन्यांपेक्षा कमी सेवा झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार नाही. बालवाडी शिक्षक, मानधनावरील अधिकारी व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, समूह संघटक, तासिका तत्त्वावर नेमलेले कर्मचारी, महापालिका आस्थापनेवर करार पद्धतीने मानधनावर नेमलेले कर्मचारी, शासनाकडून पगारापोटी अनुदान मिळणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना बोनसचा लाभ मिळेल.

महापालिकेचे निलंबित अधिकारी व कर्मचारी, सन 2024-25 वर्षांत सेवानिवृत्त, मयत किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले, राजीनामा दिलेले, सेवेतून कमी केलेले, सेवा समाप्त केलेले कर्मचारी, यांचा सेवाकाल विचारात घेऊन बोनस देण्यात येणार आहे.


महापालिकेच्या सन 2024-25 च्या अर्थसंकल्पात बोनससंदर्भात रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. ती रक्कम कमी पडत असल्यास तरतूद वर्गीकरण करावे. हा बोनस दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश आयुक्तांनी लेखा विभागास दिले आहेत.

दरम्यान, बोनससंदर्भात भविष्यात आक्षेप निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ती रक्कम वसूल केली जाणार आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.