कर्नाटक मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखलीतून सात जणांचे अपहरण

0
210

चिखली , दि. ६ (पीसीबी) : कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहा जणांनी चिखली येथून सात जणांचे अपहरण केले. तसेच त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाइल जबरदस्तीने घेऊन गेले. ही घटना सहयोगनगर चिखली येथे शुक्रवारी (दि. 4) रात्री घडली.

वीरसिंग सेऊ पवार (वय 35, रा. भोगालिंगदल्ली, पो. आयनोल्ली, ता. चिंचोळी, जि. कलबुर्गी, राज्य कर्नाटक) यांनी शनिवारी (दि. 4) चिखली पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. त्यानुसार लोकेश बाबुराव फत्तेपूरकर आणि विजयकुमार माडगे (दोघेही रा. आयनोल्ली, ता. चिंचोळी, जि. कलबुर्गी, राज्य कर्नाटक) तसेच त्यांचे आठ साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगणमत करून आयनोल्ली) ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी पार्टी बहुमत मिळून सरपंच पद त्यांना मिळावे, यासाठी फिर्यादी हे चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहयोग नगर येथील असलेल्या कृष्ण लॉज येथे मुक्कामास होते. शनिवारी रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या गावाकडील ओळखीचे आरोपी फतेपुरकर आणि माडगे हे इतर साथीदारांसोबत तिथे आले. त्यांनी फिर्यादी व इतर सात ग्रामपंचायत सदस्यांचे चार वाहनांमधून अपहरण केले. फिर्यादी यांच्या खिशातून 19 हजार रुपये व मोबाइल तसेच साक्षीदार शेख बक्‍तीयार जागीरदार यांच्याकडील मोबाईल व साडेआठ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. उर्वरित चार ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण करून नेले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.