नागपूर,दि .7 (पीसीबी): कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. आता नागपुरातही एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
दोन्ही लहानग्यांना HMPV ची लागण झाल्याचं निदान 3 जानेवारीला झालं होतं. दोघांचाही HMPV चा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाली होती. 3 जानेवारी रोजी दोघांनाही HMPV ची लागण झाली होती. दोघांनाही योग्य औषधोपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. दोघांमध्येही सामान्य लक्षणं दिसत होती. कोणतीही गंभीर लक्षणं नसल्यामुळे दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं नाही.