कर्नाटकात लवकरच “ऑपरेशन लोटस”; भाजपच्या माजी मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ…

0
295

देश, दि. ०४ (पीसीबी) – कर्नाटकात गेल्या काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा मोठ्या संख्येने पराभव करत सरकार स्थापन केले. सरकार सत्तेवर आल्यानंतर सत्ताधारी काँग्रेस सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू होणार आहे का?, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आता भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मंत्री केएस ईश्वरप्पा यांच्या वक्तव्यावरून या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी काँग्रेस सरकार पाडण्यासाठी राज्यात लवकरच ऑपरेशन लोटस सुरू होईल, असा दावा भाजप नेत्याने केला. माध्यमांशी बोलताना माजी मंत्री ईश्वरप्पा म्हणाले की, काँग्रेसला देशात भविष्य नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचे सरकार नसल्याचा दावा त्यांनी केला.

केएस ईश्वरप्पा हे शिवमोग्गा येथील भाजपचे आमदार आहेत. ते म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते राज्यात मोठ्या बातम्या करत आहेत. भाजपचे निम्मे आमदार आमच्या पक्षात सामील होतील, असे ते सांगत आहेत, मात्र आतापर्यंत एकाही आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसला भाजपचा किमान एक आमदार आपल्या बाजूने आणण्याचे आव्हान दिले आणि त्यासाठी एक महिन्याची मुदतही निश्चित केली. ‘थांबा आणि बघा, काँग्रेसच्या आमदारांना पक्षाकडून कोणतीही आशा नाही. काँग्रेसला या देशात भविष्य नाही, असंही ते म्हणाले.

याआधीही भाजप नेते ईश्वरप्पाही त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होत्या. यापूर्वी जूनमध्ये त्यांनी मंदिरांसाठी मशिदी पाडल्या जातील असे सांगून वादाला तोंड फोडले होते. या वर्षी एप्रिलमध्ये ईश्वरप्पा यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्यांच्या राजकीय वक्तव्ये थांबलेली नाही.

भाजपचे प्रवक्ते एमजी महेश म्हणाले, सुमारे ४५ काँग्रेस नेते त्यांच्या संपर्कात आहेत आणि भाजपचा एकही आमदार पक्ष सोडत नाही. या विधानाला उत्तर देताना काँग्रेसचे आमदार शेट्टर म्हणाले की, राज्यात काँग्रेसचे मजबूत आणि स्थिर सरकार असल्याने काँग्रेसचे आमदार पक्ष सोडण्याचे कोणतेही कारण नाही. शेट्टर म्हणाले, ‘मी त्यांना आधी भाजपच्या आमदारांना एकत्र ठेवण्याचा सल्ला देईन, ज्यात त्यांच्या माजी आमदारांचा समावेश आहे, कारण भाजप राज्यात आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे.