कर्नाटकात काँँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर युतीचे संकेत

0
211

बंगळूर, दि. ११ (पीसीबी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर (जेडीएस) काँग्रेस मतदानोत्तर युती करणार नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले. काल विधानसभेसाठी मतदान झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी ‘काँग्रेस-जेडीएस’च्या युतीची शक्यता फेटाळून लावली. भाजपला बाजुला ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जनतादल एकत्र येणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात २०१८ मध्ये काँग्रेसला ७८ तर ‘जेडीएस’ला ३७ जागा मिळाल्या होत्या तर भाजप १०४ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ‘जेडीएस’ आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती. या दोन्ही पक्षाचे आघाडी सरकार कर्नाटकमध्ये सत्तेवर आले होते. पण, नंतर बंडखोर आमदारांनी भाजपबरोबर घरोबा केल्याने ‘काँग्रेस-जेडीएस’चे सरकार कोसळले होते.

हा धागा पकडून शिवकुमार यांनी यावेळच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची मतदानोत्तर युती होणार नाही, असे सांगत काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल, असा दावा शिवकुमार यांनी केला. सिद्धरामय्या यांच्या काँग्रेसला १३० ते १५० जागा मिळतील, या दाव्याला आणि पक्ष निसटते बहुमत मिळेल, या निष्कर्षालाही त्यांनी दुजोरा दिला.