कर्नलची पत्नी असल्याचे भासवून घातला 75 हजारांचा गंडा

0
379

बावधन, दि. १६ (पीसीबी) – भारतीय सैन्य दलातील कर्नल पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे भासवून एका महिलेने एका व्यक्तीला 75 हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना 14 मे रोजी बावधन खुर्द येथे घडली.

याप्रकरणी सतीश एकनाथ कोल्हे (वय 40, रा. कोलते पाटील बावधन खुर्द) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना एका महिलेने त्यांना फोन केला. फोनवरील महिलेने ती भारतीय सैन्य दलातील कर्नल या पदावर अधिकारी असलेल्या व्यक्तीची पत्नी असल्याचे भासवले. फिर्यादी यांना गुगल पे ॲपच्या माध्यमातून 75 हजार रुपये पाठविण्यास भाग पाडत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.