– आमदार रोहितदादा पवार व वारकरी आघाडीचे ह.भ.प. दत्ता महाराज दोहणे पाटील उपोषणास बसणार.
– “शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होईपर्यंत शांत बसणार नाही” – रविकांत वरपे
पुणे, दि. 19राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीने सोमवार, २० ऑक्टोबर रोजी देहूगाव येथे लाक्षणिक उपोषण होणार आहे.
पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा फ्रंटल सेल प्रभारी आमदार रोहित पवार, आणि वारकरी आघाडीचे राज्य प्रमुख ह.भ.प. दत्ता महाराज दोहणे पाटील हे उपोषणास बसणार असून, “जगद्गुरू संत तुकाराम महाराज कर्जमाफी योजना” या योजनेचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे ६८ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे ६० हजार हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. हेक्टरी ₹५०,००० ची मदत आणि सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.
या उपोषण कार्यक्रमास आमदार रोहितदादा पवार,,,,,,,, तुषार कामठे (अध्यक्ष, पिंपरी -चिंचवड,), प्रशांत जगताप (अध्यक्ष, पुणे शहर), देवदत्त निकम (अध्यक्ष, पुणे जिल्हा – शिरूर व मावळ),, विजय कोलते (अध्यक्ष, पुणे जिल्हा – बारामती,) आणि दत्ता पडवळ (अध्यक्ष, मावळ तालुका), विकास लवंडे (प्रवक्ते), रविकांत वरपे (प्रवक्ते) उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सांगता दुपारी २ वाजता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विश्वप्रार्थना आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने होईल
इतिहासाची पार्श्वभूमी
महाराष्ट्रात १६२८ ते १६३० च्या दुष्काळात संत तुकाराम महाराजांनी आपले ‘कर्जखाते’ बुडवून समाजासमोरील आदर्श ठेवला होता. त्याच भावनेतून, केंद्रीय कृषिमंत्री असताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ₹७२,००० कोटी रुपयांची ऐतिहासिक कर्जमाफी दिली होती.
त्या परंपरेचा पुढाकार घेत, या सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी हे उपोषण करण्यात येत आहे, असे ह.भ.प. दत्ता महाराज दोहणे पाटील यांनी सांगितले.