दि . ९ ( पीसीबी ) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोट्यवधी भारतीयांना मोठा दिलासा दिला. जगात टॅरिफ वॉर भडकलेले असतानाच आरबीआयने रेपो दरात कपातीची घोषणा केली. त्यामुळे कार, घराचा ईएमआय कमी होणार आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आल्याने आता रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आल्याने आता रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळं गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदरात पुन्हा मोठी कपात होणार आहे. आरबीय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हे पद स्वीकारल्यापासून सलग दुसऱ्यांदा भारतीय ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज सकाळी 10 वाजता रेपो रेट जाहीर केले. त्यानुसार, सलग दुसऱ्यांदा व्याजदरात 0.25 टक्क्यांची कपात केली. ही कपात जवळपास 5 वर्षांत पहिल्यांदाच होताना दिसत आहे. गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कर्जावरील व्याजदरात मोठी कपात झाली. त्याचा फायदा आता रिअल इस्टेट आणि वाहन बाजाराला होईल.
अमेरिकेच्या नव्या आयातशुल्क धोरणामुळे जगभरातील भांडवली बाजारांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला सेन्सेक्स तब्बल 2300 अंकांनी तर निफ्टी जवळपास 800 अंकांनी गडगडला होता. अशाच आरबीआयने मोठा दिलासा दिला आहे.
रेपो रेट घटल्यामुळे कोणाला फायदा?
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार 1 ऑक्टोबर 2019 नंतर ज्यांनी फ्लोटिंग व्याजदरावर कर्ज घेतलं आहे त्यांना बाहेरच्या बेंचमार्कशी जोडणं गरजेचे आहे. त्यामुळे आरबीआयनं रेपो रेट घटवल्यास बँकांना देखील गृह कर्जावरील व्याज घटवावं लागू शकतं. जर आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केली तर गृहकर्ज देखील स्वस्त होऊ शकतं. याचा फायदा नवं गृहकर्ज घेणाऱ्यांना आणि फ्लोटिंग इंटरेस्ट रेट असणाऱ्यांना फायदा होईल. जानेवारी ते एप्रिल दरम्यान अनेक सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्या गृहकर्जात 5-25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.