कर्करोगाचे बनावट इंजेक्शन विक्री प्रकरणी मेडिकल दुकानदारावर गुन्हा दाखल

0
63

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) : कर्करोगावरील बनावट इंजेक्शन विक्री प्रकरणी चिंचवड येथील एका मेडिकल दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 24) सायंकाळी निरामय हॉस्पिटल समोरील रोडवर चिंचवड येथे करण्यात आली.

श्रीप्रसाद श्रीहरी कुलकर्णी (वय 42, रा. सिंहगड रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या मेडिकल दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी महेश विष्णू कांबळे (वय 42, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे हे टाकेडा फार्मासिटिकल लिमिटेड या कंपनीत काम करतात. त्यांची कंपनी कर्करोग या आजारासाठी वापरले जाणारे ऍडसेट्रिस हे इंजेक्शन तयार करते. त्यांच्या कंपनीचे स्वामित्व असलेले बनावट इंजेक्शन कुलकर्णी यांनी त्यांच्या मेडिकल मध्ये विक्रीसाठी ठेवले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी तीन लाख 50 हजार रुपये किमतीचे बनावट इंजेक्शन जप्त केले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.