बीड, दि. 21 (पीसीबी): राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी करुणा यांनी इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडेंना पाडण्याचं आवाहन परळी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना केलं होतं. त्याचप्रमाणे काही तरुणींची नावं घेत करुणा शर्मा यांनी गंभीर आरोप केले.
करुणा शर्मा यांनी व्हिडिओमध्ये काय म्हटलं?
नमस्कार मी करुणा धनंजय मुंडे, परळीच्या जनतेला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, की धनंजय मुंडे यांना पाडा, एक मतदान करु नका, कारण धनंजय मुंडेंइतका सत्तेचा गैरवापर कुणीच केला नाही. स्वतःच्या बायकोला तीन-तीन वेळा जेलमध्ये टाकणं, गुंडांकरवी मारहाण करुन घेणं, पोलिसांकडून पत्नीला मारहाण करणं… तुमचं काय भलं करेल तो? असे प्रश्न करुणा शर्मा यांनी उपस्थित केले.
माझ्या मुलाचे अश्रू परळीत सांडले
मुंबईत दिवसभर पोलीस उभे राहायचे आणि मी वैतागून जायचे. माझा मुलगा… माझ्या मुलाचे अश्रूही परळीत सांडले आहेत, असं म्हणताना करुणा शर्मा यांचा कंठ दाटून आला. मुलांनी आपल्या आईला तुरुंगात जाताना पाहिलं आहे, असं पुढे त्या म्हणाल्या.
मुलींची नावं घेऊन आरोप
म्हणून मी हात जोडून विनंती करते, की याला मतदान नका करु. जो मेहुणीवर बलात्कार करतो. तुमच्या पैशांनी, जनतेच्या पैशांनी काय करतो.. फक्त प्राजक्ता माळीसारख्या मुलींचा.. स्वातिका शिरोडकर, मोनिका, लता टेपी यासारख्या मुलींचं घर भरतं, ओबेरॉय हॉटेल पूर्ण बुक असतं, या लोकांच्या अय्याशीसाठी, असा घणाघाती आरोपही करुणा शर्मा यांनी केला आहे.
हजारो कोटींचा निधी खालला
माझी हात जोडून विनंती आहे, की अशा लोकांना मतदान नका करु. अपक्ष उमेदवारही उभे असतील, चांगले लोकही उभे असतील. का तुम्हाला तोच-तोच नेता हवाय? किती गैरवापर करतात. तुमचा हजारो कोटी रुपयांचा निधी खाऊन टाकतात, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.