करदात्यांसाठी आयकर विभागाकडून मोबाइल अ‍ॅप लाँच; जाणून घ्या AIS फॉर Taxpayer अ‍ॅपचे फायदे

0
357

मुंबई : आयकर विभागाने करदात्यांना मदत करण्यासाठी एक नवीन मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. आयकर विभागाच्या या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने, करदात्यांना वार्षिक माहिती विवरणपत्र किंवा करदात्यांची माहिती पाहता येईल. या मोबाईल अ‍ॅपचा वापर करून करदाते त्यांची टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) इत्यादींशी संबंधित माहिती पाहू शकतात. या मोबाईल अ‍ॅपला एआईएस फॉर टॅक्सपेअर (AIS for Taxpayer) असे नाव देण्यात आले आहे.

आयकर विभागाच्या या अ‍ॅपच्या मदतीने करदात्यांना व्याज, लाभांश, शेअर व्यवहार, कर भरणा, आयकर परतावा आणि इतर माहिती पाहता येईल. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने म्हटले की AIS किंवा TIS नावाच्या या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये जीएसटी डेटा आणि परदेशातून येणारी रक्कम इत्यादीची माहिती देखील मिळू शकते