कमी वेळेत जास्त पैसे देण्याच्या बहाण्याने 18 लाखांची फसवणूक

0
131

भोसरी, दि. 20 (प्रतिनिधी)

कमी वेळेत जास्त पैसे कमवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची 18 लाख 60 हजार 56 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 22 डिसेंबर ते 10 फेब्रुवारी या कालावधीत भोसरी येथे घडला

याप्रकरणी 38 वर्षीय व्यक्तीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार RanjeetYadav या टेलिग्राम अकाउंट धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने टेलिग्राम वरून फिर्यादीस संपर्क केला त्यांना कमी वेळेत उत्तम नफा देण्याच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी कडून वेळोवेळी वेगवेगळ्या अकाऊंट नंबर वर 18 लाख 60 हजार 56 रुपये घेत त्यांची आर्थिक फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.