कमी पैशात घर देण्याच्या बहाण्याने बलात्कार

0
77

देहूरोड, दि. 10 (पीसीबी) : कमी पैशात घर मिळवून देतो, असा बहाणा करून तरुणीला निर्मनुष्य ठिकाणी नेले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 6) संध्याकाळी सहाच्या सुमारास किवळे येथे घडली.

अक्षय गवळी (वय 35, रा. खडकी बाजार, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने मंगळवारी (दि. 8) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचे ओळखीचे समीर कांबळे याला मला कमी पैशात घर घ्यायचे आहे, असे सांगितले. समीर याने त्याचा मित्र आरोपी अक्षय गवळी याच्याशी तरुणीची ओळख करुन दिली. दरम्यान, तुम्हाला कमी पैशात घर घेऊन देतो, असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांना चार ते पाच घरे दाखवली. मात्र, किंमत जास्त वाटल्याने फिर्यादी यांनी व्यवहार करण्यास नकार दिला. रविवारी सायंकाळी आरोपी रुम दाखवतो, असे सांगुन फिर्यादी यांना दुचाकीवरून घेऊन गेला. किवळे येथील निर्मनुष्य ठिकाणी गेल्यानंतर आरोपीने त्याचे खिशातुन चाकु काढला. फिर्यादी यांना दमदाटी करुन त्यांच्याशी जबरजस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबाबत कोणाला सांगायचे नाही, पोलीस चौकीत अजीबात जायचे नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.