कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर, सट्टा बाजार वाघेरेकडे झुकलेला ?

0
237

दि १४ मे (पीसीबी ) – मावळ लोकसभा मतदारसंघात गतवेळेपेक्षा म्हणजे २०१९ पेक्षा तब्बल चार टक्के मतदान कमी झाल्याने त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ निहाय एकूण मतदान किती झाले त्याची अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाने जाहीर केली आहे.
गतवेळी म्हणजे २०१९ मध्ये २२ लाख ९८ हजार १३० मतदारांपैकी १३ लाख ६९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केले होते. टक्केवारी ५९.५९ होती. यावेळी एकूण मतदार २५ लाख ८५ हजार १८ पैकी १४ लाख १८ हजार ४३९ म्हणजेच ५४.८७ मतदारांनी आपला अधिकार बजावला आहे. टक्केवारीत विचार केला तर तब्बल चार टक्क्यांनी घट झाली आहे. पाच वर्षांत एकूण मतदारांत १ लाख ८७ हजार मतदार वाढले पण प्रत्यक्षात टक्केवारी कमी आहे. तालुका निहाय कोणत्या तालुक्यात किती मतदान झाले आणि एकूण टक्केवारी किती त्याचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.

१) पनवेल – २,९५,९७३ (५०.०५ टक्के)
२) कर्जत – १,८९,८५३ (६१.४० टक्के)
३) उरण – २,१४,१६९ (६७.०७ टक्के)
४) मावळ – २,०६,९४९ (५५.४२ टक्के)
५) चिंचवड – ३,२२,७०० (५२.२० टक्के)
६) पिंपरी – १,८८,७९५ (५०.५५ टक्के)
७) एकूण – १४,१८,४३९ (५४.८७ टक्के)

दरम्यान, पनवेल आणि चिंचवड हे दोन मोठे विधानसभा मतदारसंघ परंपरेने भाजपच्या मागे उभे असतात. दोन्ही मोठ्या शहरांत महापालिकेत भाजपची सत्ता होती. एकूण मतदानात सुमारे सहा लाख हिस्सा या दोन तालुक्यांचा आहे. महायुतीच्या श्रीरंग बारणे यांची सर्व मदार या दोन मोठ्या मतदारसंघावरच आहे. अन्य चार तालुक्यांत मिळून आठ लाख मतदान झाले आहे आणि तिथेच वाघेरे यांची संधी वाढली आहे.
उरण हा तालुका शेकापच्या वर्चस्व असते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे तिथे वर्चस्व कायम आहे. संजोग वाघेरेंना तिथे मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वाधिक म्हणजे ६७ टक्के मतदान तिथे झाले असून त्याचा फायजा वाघेरे यांना होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. कर्जत मध्ये बारणे आणि वाघेरे हे बरोबरीत असतील, असा अंदाज आहे. मावळ हा भाजपचा पारंपरीक गड असल्याने तसेच आमदार सुनिल शेळके आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनी बारणे यांची मनापासून साथ केल्याने तिथेही वाघेरे यांच्यापेक्षा बारणे मताधिक्य घेतील, असे म्हटले जाते. पिंपरी राखीव मध्ये आमदार अण्णा बनसोडे यांनी सुरवातीला वाघेरे यांची पालखी उचलली आणि अगदी शेवटच्या टप्प्यात बारणे यांना साथ दिली. पिंपरीत बारणे आणि वाघेरे हे दोघे बरोबरीत असतील, असा अंदाज आहे.