कमी किमतीत दुचाकी देण्याच्या बहाण्याने 10 लाखांची फसवणूक

0
124

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) चिखली,
कमी किमितीमध्ये शोरूम मधून नवीन दुचाकी घेऊन देतो, असे सांगत दोघांनी मिळून नागरिकांची दहा लाख 57 हजार 100 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 10 जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत रुपीनगर, मोरेवस्ती येथे घडली.

अमोल सुरेश वाघमारे (रा. मोरेवस्ती, चिखली), दुर्गेश चंद्रकांत शिंदे (रा. शिवाजीवाडी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी श्रीकांत पोपटराव देवकाते (वय 40, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी आणि इतर नागरिकांना ‘तुम्हाला कमी किमतीमध्ये शोरूम मधून नवीन दुचाकी घेऊन देतो. तुम्हाला तुम्ही विकत घेणाऱ्या नवीन गाडीवर तुमच्या नावावर 100 टक्के कर्ज घ्यावे लागेल. त्याचे हप्ते आम्ही भरू’ अशी बतावणी करून कमी किमतीमध्ये दुचाकी घेऊन देण्याबाबत विश्वास संपादन केला.

त्यानंतर फिर्यादी आणि इतर नागरिकांना आयडीएफसी फर्स्ट बँकेतून दुचाकीसाठी कर्ज मंजूर करून दिले. त्या कर्जाचे हप्ते फिर्यादी आणि इतर नागरिकांना भरण्यास सांगत त्यांच्याकडून एकूण 10 लाख 57 हजार 100 रुपये घेऊन त्याचा अपहार करत फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.