कमांड ऍन्ड कंट्रोल सेवा तात्पुरती बंद राहणार

0
211

पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२२ :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे मार्फत निगडी येथे कार्यरत असलेले इंटीग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटरची सेवा दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी दुरुस्तीच्या कामकाजासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अँप  आणि वेब पोर्टल, सारथी हेल्पलाईन, बांधकाम परवानगी ऑनलाईन प्रणाली सेवा अद्ययावत करणाच्या कारणामुळे या सेंटरमधील सेवा तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात येणार आहे.

सदर अँप आणि वेब पोर्टलची सेवा अद्ययावत करणे व दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी अँप आणि वेब पोर्टलची सेवा बंद ठेवणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने दि. २७/१२/२०२२ रोजी रात्री ८ ते १२ या चार तासांच्या कालावधीसाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी  अँप   आणि वेब पोर्टलची सेवा तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बुधवार दि. २८ डिसेंबर २०२२ रोजी ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.