कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटवण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

0
525

निगडी, दि. १० (पीसीबी) – कब्रस्तान मधील कबरीवरील माती हटविण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील सुमारे 50 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.

रिजवान इक्बाल शेख (वय 32, रा. ओटास्कीम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इम्रान मुकरताल, गुड्डूलाल मुकरताल, हैदर शेख, रज्जाक मुकरताल, वाहिद मुकरताल, अब्दुल मुकरताल, सलीम शेख, साहिल अल्लाबक्ष मुकरताल, सादिल मुकरताल, मुजाहिद मुकरताल, मोसिम शेख (सर्व रा. ओटास्कीम, निगडी) आणि अन्य 10 ते 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच्या परस्पर विरोधात इम्रान इस्माईल मुकरताल (वय 35, रा.ओटास्कीम, निगडी) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार आलम कुरेशी, इम्रान खान, रिजवान शेख, इक्बाल शेख, फिरोज, अब्दुल्ला, मजीद शेख, मोहम्मद साद, अब्दुल्ला साद, इम्तियाज खान, हर्षद खान, अमीन शेख, अली सय्यद शेख, बंदेअली सय्यद शेख, इम्तियाज खान, मेहबूब शेख, मोसिन उर्फ अजीमोद्दिन शेख, शफिक शेख, नाजीम शेख, तंजीम शेख आणि इतर पाच ते सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जन्नतुल बरवी वेलफेअर ट्रस्टच्या कब्रस्तान मधील कबरीवरील माती जेसीबीने हटवण्याच्या कारणावरून दोन गटात शनिवारी वाद झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना मारहाण केली आहे. भांडण झाल्यानंतर दोन्ही गटातील आरोपींनी शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.