कन्स्ट्रक्शन कार्यालयात तोडफोड दोघांवर गुन्हा दाखल

0
11

चाकण, दि. 04 (पीसीबी) : लिकेज होऊन खोलीत पाणी येत असल्याने दोघांनी एका कन्स्ट्रक्शन कार्यालयात तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. 3) दुपारी एक वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी मधील साई दत्त पॅराडाइज समोरील सेल्स ऑफिस मध्ये घडली.

सोमनाथ बिभीषण पाडवदे, सुमित बिभीषण पाडवदे (दोघे रा. नानेकरवाडी, चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेंद्र नारायण तुपे (वय 45, रा. नानेकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मंगळवारी दुपारी फिर्यादी यांच्या कार्यालयात आले. तुम्ही आमच्या वरील रूमचे फिलिंगचे काम केले आहे. तरीही आमच्या रूममध्ये लिकेज होत आहे. असे म्हणून शिवीगाळ करून तुम्ही धंदा कसा करता तुम्हाला मारून टाकतो अशी धमकी देत ऑफिसच्या प्रवेशद्वाराची काच फोडून नुकसान केले. तसेच फुटलेली काच फिर्यादी यांच्या हातावर मारून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.