कनार्टकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस्. भगवान व बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचे प्रकरण

0
228

पुणे, दि.३० (पीसीबी)-श्रीराम आणि श्रीरामचरितमानस यांचा अपमान करणार्‍यांना तात्काळ अटक करा ! – हिंदु जनजागृती समिती/हिंदू संघटनांची आंदोलनाद्वारे पुणे येथे मागणी कनार्टकातील वादग्रस्त प्राध्यापक के. एस्. भगवान यांनी, ‘भगवान श्रीराम पत्नी सीतासोबत दिवसभर दारू पीत होते. राम हा आदर्श राजा नाही’ अशी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. यापूर्वीही प्रा. भगवान यांनी अशीच विधाने केल्यामुळे त्यांना तुरूंगात टाकण्यात आले होते. ‘पुन्हा अशी आक्षेपार्ह विधाने करणार नाही’, या अटीवर त्यांना जामीन मिळाला होता. या अटीचा भंग केल्याने त्यांचा जामीन रद्द करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी सरकारकडे आम्ही आंदोलनाद्वारे करत आहोत. हिंदुस्थानात हिंदूंच्या श्रध्दास्थानांवरील आक्रमणे सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही हिंदू जनजागृती समितीचे श्री पराग गोखले यांनी या वेळी दिला. यावेळी प्रा. विठ्ठल जाधव यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी डहाणूकर कॉलनीतील राम मंदिराचे श्री श्याम देशपांडे हेही उपस्थित होते. तसेच यावेळी 70 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ या आंदोलनाला उपस्थित होते.

हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवणार्‍यांच्या विरोधात हिंदु समाजामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. या विरोधात 24 जानेवारी या दिवशी श्री. दशभूजा गणपती मंदिरासमोर,महर्षि कर्वेनगर रस्ता, पौड फाटा, एरंडवणा,पुणे येथे सायंकाळी 4.30 वाजता हे आंदोलन करण्यात आले. या वेळी ‘जो नहीं हमारे राम का, नहीं किसी के काम का‘, ‘प्रभू श्रीराम का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्थान’ आदी घोषणा देण्यात आल्या. या वेळी आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

याचप्रकारे बिहारचे शिक्षणमंत्री प्रा. चंद्रशेखर यांनी संत तुलसीदास विरचित ‘श्रीरामचरितमानस’ला ‘नफरत फैलानेवाला’ ग्रंथ म्हटले, तर उत्तर प्रदेशचे समाजवादी पाटीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’मधील दोह्यांवर बंदीची मागणी करत हे ग्रंथ जप्त करून नष्ट करायला हवेत, अशी संतापजनक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे या दोघांवर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

जर ‘श्रीरामचरितमानस’ हा ग्रंथ ‘नफरत फैलानेवाला’ असेल, तर हिंदूंना ‘काफिर’ म्हणत ठार मारण्यास सांगणार्‍या आणि महिलांना ‘सैतान’ मानणार्‍या ग्रंथांबद्दल यांना काय म्हणायचे आहे, असा प्रश्न हिंदू जनजागृती समितीचे श्री पराग गोखले यांनी या आंदोलनाच्या वेळी उपस्थित केला. अशा प्रकारे देवता, धर्मग्रंथ, संत, धार्मिक कृती यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य असेल वा चित्रपट, नाटक, चित्रकला, पुस्तक आदीद्वारे अवमान केला जात आहे. या होणारा अवमान रोखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर ईशनिंदा विरोधी कायदा करावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.