कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा

0
46

चाकण, दि. 1 (पीसीबी) :

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहकल रोड डायमंड चौकाजवळ शनिवारी (दि. 30) ही कारवाई करण्यात आली.

कुशाबा यमा पारधी (वय 28), संदीप कावजी वडेकर (वय 25, दोघे रा. पिपरगणे, ता. आंबेगाव), शंकर उत्तम पाटील (वय 45, रा. दहिगाव, ता. माळशिरस, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल कोंढवळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुशाबा आणि संदीप हे एका बोलेरो पिकप मधून दोन बैलांना कत्तलीसाठी घेऊन जात होते. तसेच आरोपी शंकर पाटील हा बोलेरो पिकप मध्ये तीन बैलांना कत्तलीसाठी घेऊन जात होता. रोहकल रोडवर डायमंड चौकाजवळ चाकण पोलिसांनी कारवाई करत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. आरोपींकडून पाच जनावरांची सुटका करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.