कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

0
340

चाकण, दि. २५ (पीसीबी) – कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 24) सकाळी चाकण येथे करण्यात आली.

श्रीकांत आनंद लोंढे (वय 33, रा. चक्रपाणी रोड, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शरद खैरनार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीकांत याने त्याच्या ताब्यातील पिकप मध्ये दोन जनावरे करकचून रस्सीने बांधली. पिकप मध्ये जनावरांच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था केली नाही. तसेच जनावरे वाहतूक करण्याचा व विक्रीचा परवाना नसताना त्याने कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.