कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक; 22 म्हशींची सुटका

0
420

चाकण, दि. ०४ (पीसीबी) – कत्तलीसाठी तीन वाहनांमधून 22 म्हशी घेऊन जात असताना चाकण पोलिसांनी कारवाई करून तिन्ही वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पोलिसांनी 22 म्हशींची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 2) रात्री साडे अकरा वाजता पुणे नाशिक महामार्गावर बैल बाजाराच्या बाहेर करण्यात आली.

जमीर हुसेन शेख (वय 30, रा. जुन्नर, पुणे), पापा फक्रुद्दीन शेख (वय 30, रा. भवानी पेठ, काशेवाडी, पुणे), आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल नांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी विना परवाना चारा पाण्याची सोय न करता 22 म्हशींना दाटीवाटीने तीन वाहनांमध्ये भरले. जनावरांची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारे वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र न घेता आरोपी 22 म्हशींना कत्तलीसाठी घेऊन जात होते. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी बैल बाजाराच्या बाहेर तीन वाहने अडवून कारवाई केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.