कट मारल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण

0
89

महाळुंगे, दि. ०२ (पीसीबी) : कट मारल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 30) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास खालुम्ब्रे येथे घडली.

इजाज यासीन साई (वय 25, रा. कोरेगाव फाटा, ता. खेड) असे मारहाण झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/एल एल 4301 क्रमांकाच्या वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साई हे त्यांच्या ताब्यातील टाटा मिक्सर एचपी चौक ते खालुम्ब्रे या मार्गाने घेऊन जात होते. त्यावेळी त्यांच्या मिक्सरने एका वाहनाला कट मारला. त्या कारणावरून त्या वाहन चालकाने फिर्यादी यांचा ट्रक थांबवून त्यांना गाडीतून खाली ओढले. त्यानंतर पान्हा आणि रॉडने मारून त्यांना जखमी केले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.