कट मारल्याच्या कारणावरून चौघांना मारहाण

0
456

चिखली, दि. २१ (पीसीबी) – कट का मारला असा जाब विचारत चौघांनी एकास मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अन्य तिघांना देखील मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी (दि. 20) सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळ, चिखली येथे घडली.

अफरोज अहमद खान (वय 36, रा. कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुंदन बालघरे, संभा बालघरे, महेश बालघरे, गोविंद बालघरे (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘तू आम्हाला दुचाकीवरून कट कसा काय मारला’ असे म्हणत फिर्यादी यांचा पुतण्या आफताब यांना शिवीगाळ केली. तसेच त्याला दमदाटी करून मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी, आसिफ खान व आरिफ खान गेले असता आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच आसिफ खान आणि आरिफ खान यांना मारहाण करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.