कट मारल्याची माफी मागण्यास सांगितली म्हणून केला कोयत्याने वार

0
460

पायी जाणाऱ्या पत्नीला गाडीने कट मारल्यानंतर गाडी चालकाला पतीने माफी मागण्यास सांगितले, या रागातून गाडी चालकाने पतीवर कोयत्याने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.29) पिंपरीतील तुकारामनगर येथे घडली आहे,

याप्रकरणी अमित बाळासाहेब पिसाळ (वय 34 रा.कासारवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून योगेश कांबळे (वय 25 रा. फुगेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायी फिरत असताना आरोपीने फिर्यादीच्या पत्नीला गाडीने कट मारला. याबाबात फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीला व त्यांच्या भावाला सांगितले. फिर्यादी व भावाने आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला व माफी मागण्यास सांगीतली. याचा राग येवून आरोपीने थेट कोयता काढून फिर्यादीला मारहाण करत जखमी केले. यावरून पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.