कट मारल्याचा जाब विचारल्याने मारहाण

0
13
crime

चाकण,दि .7 (पीसीबी)
दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारल्याने एका व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. ५) माणिक चौक चाकण येथे घडली.

अभिषेक कैलास खांडेभराड (वय २९, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र मारुती गर्जे (वय ४२, रा. बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला घेऊन दुचाकीवरून जात होते. माणिक चौकात आल्यानंतर आरोपी राजेंद्र याने त्याच्या दुचाकीने अभिषेक यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे अभिषेक खाली पडले. दुचाकीला कट मारल्याचा जाब विचारला असता राजेंद्र याने अभिषेक यांना मारहाण केली. अभिषेक यांच्या पत्नीला धक्काबुक्की करून ढकलून दिले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.