कचऱ्याचा डबा घरासमोर ठेवला म्हणून लोखंडी फायटरने मारहाण

0
266

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कच-याचा डबा घरासमोर ठेवल्याच्या कारणावरून वाद झाला. यात दोघांनी मिळून एकास बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 1) दुपारी संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

उद्धव श्रीकृष्ण सोमाणी (वय 38, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमन अयाज शेख (वय 18), महिला (वय 65, दोघे रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कच-याचा डबा घरासमोर ठेवल्याच्या कारणावरून आरोपी महिलेचे आणि फिर्यादी यांच्या वडिलांचे भांडण झाले. त्यावरून आरोपींनी लोखंडी फायटर, हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करून दमदाटी केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.