कचरा गाडीवरील कामगार महिलेचा विनयभंग

0
239

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा गाडीवर काम करणा-या महिलेचा वाहन चालकाने विनयभंग केला. पीडित महिलेने आरोपी चालकापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन केले. याप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 15 नोव्हेंबर 2021 ते 4 जुलै 2022 या कालावधीत पाटीलनगर प्रभाग क्रमांक एक परिसरात घडली.

लक्ष्मण खंडू साळवे (वय 28, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याला अटक केली आहे. याबाबत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साळवे हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा गोळा करणा-या गाडीवर जनवानी फाउंडेशनच्या वतीने चालक म्हणून काम करत होता. फिर्यादी महिला त्या गाडीवर काम करत होत्या. आरोपीने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले.