कंपनी सी.एस.आर. फंडाचे पैसे पिंपरी चिंचवड महानगरपालिकने घेउ नयेत – माधव पाटील

0
359

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – बुधवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकने शहरातील सर्व सामाजिक संस्थांची बैठक बोलावली होती. यावेळी आयुक्त शेखर सिंह यांनी आगामी काळात करण्यात येणारे पर्यावरणविषयक कामाचे सादरीकरण केले आणि संस्थांना यावर सूचना करण्यास सांगितले. यावेळी अंघोळीची गोळी या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी काही सूचना मांडल्या.

तळवडे येथे होऊ घातलेल्या बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी पालिकेने चाकण, तळेगाव आणि भोसरी एमआयडीसी मधील कंपन्यांनाचा सी.एस.आर. फंड वापरू नये कारण अनेक छोट्या सामाजिक संस्था सी.एस.आर. फंड वापरून महिला सक्षमीकरणास हातभार लावतात. तसेच अनेक दुर्बल घटकांना या फंडामुळे सहाय्य्य मिळते.पालिकेचे वार्षिक बजेट सुमारे ५००० कोटींचे आहे त्यामुळे तळवडेमधील या उपक्रमासाठी फक्त पालिकेचेच पैसे असावे. यावर आयुक्त म्हणाले कि एक कंपनी फक्त ३ कोटी देणार आहे जे उपक्रमाच्या फक्त ३ ते ५ टक्के असणार आहेत. यावर माधव पाटील म्हणाले कि ३ कोटीच्या या सी.एस.आर. फंडातून अनेक महिलांचे सक्षमीकरण होऊ शकते.

अनेक सामाजिक संस्था हा सी.एस.आर फंड वापरून आरोग्य आणि शिक्षण यात भरीव काम करू शकतील. तसेच पालिकेने नदीपात्रातील जलपर्णीचा योग्य वापर करून महिला बचत गटांना काम द्यावे. पालिकेने जलपर्णीवर झालेले जगभरातील संशोधन शोधून त्यातून ट्री – गार्ड किंवा कुंड्या बनवण्यासाठी बचत गटांना प्रशिक्षण द्यावे आणि यासाठी खाजगी कंपन्यांचा सी.एस.आर. फंड वापरण्यात यावा असे मत माधव पाटील यांनी व्यक्त केले.