कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करत तोडफोड

0
93

जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल

महाळुंगे, दि. ०३ (पीसीबी)
जमावाने भांबोली येथील कोरल लॉजिस्टिक इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीमध्ये जमावाने बेकायदेशीरपणे प्रवेश केला. विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर तसेच गॅस लाईन तोडून नुकसान केले. ही घटना बुधवारी (दि. 2) घडली.
चैतन्य सयाजी वाडेकर, अमोल सयाजी वाडेकर (दोघे रा. भांबोली, ता. खेड) आणि त्यांचे दहा ते पंधरा साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजित रामदास पाटील (वय 34, रा. चिंचवड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चैतन्य आणि अमोल यांची कोरल लॉजिस्टिक्स असेस्ट इंडिया प्रा लिमिटेड या कंपनीच्या लगत इमारत आहे. आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून जेसीबी व पोकलेनच्या साह्याने कंपनीमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. कंपनीच्या सुरक्षा भिंती पाडल्या. रस्त्यावर खड्डे खोदले. पाण्याच्या पाईपलाईन, विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर आणि एमएनजीएल गॅस लाईन तोडली. गॅस परिसरात पसरून लोकांच्या जीविकास धोका निर्माण केला. पोलिसांनी चैतन्य आणि अमोल या दोघांना ताब्यात घेतले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.