कंपनीत गुंतवणूक करण्यास सांगत आठ लाखांची फसवणूक

0
216

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची आठ लाख 11 हजारांची फसवणूक केली. ही घटना 18 ऑक्टोबर 2018 रोजी रॉयल ओर्चीड हॉटेल, कल्याणीनगर पुणे आणि 25 ऑक्टोबर 2018 रोजी ओर्चीड हॉटेल बाणेर येथे आणि सन 2019 साली घडली आहे.

निखिल रमणिकलाल चोटालिया (वय 32, रा. वारजे, पुणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवीकुमार संगानी (रा. काळेवाडी, पिंपरी), पृथ्वी उर्फ परविंदर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना क्यूनेट कंपनीत आठ लाख 11 हजार 35 रुपये इतके पैसे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी पैसे गुंतवले असता त्यांना ते पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.