कंपनीतून सव्वानऊ लाखांचा माल चोरीला

0
503

चाकण, दि. २० (पीसीबी) – खराबवाडी येथील कंपनीतून अज्ञात चोरटयांनी नऊ लाख 25 हजारांचा माल चोरून नेला. ही घटना 9 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दास इलेक्ट्रिकल्स कंपनीत येथे घडली.

कृष्णा अंबादास राठोड (वय 36, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीच्या पाठीमागील बाजूचा दरवाजा उघडून चोरट्यांनी वायंडिंग मशीन, रॉ मटेरियल, कॉपर वायर, एलईडी टीव्ही, ओव्हन पॅनल, इतर मटेरियल असा एकूण नऊ लाख 25 हजारांचा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.