कंपनीतील कामगाराने चोरली वायर

0
357

भोसरी, दि. १ (पीसीबी) – कंपनीत हाऊस किपींगचे काम करणाऱ्या कामगाराने कंपनीतून 33 हजार 800 रुपयांच्या वायर चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 30) सकाळी एमआयडीसी भोसरी येथे घडली.

सुनील जयभगवान चव्हाण (रा. पिंपरी) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी तीर्थ राजसिताराम यादव (वय 49, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी एमआयडीसी भोसरी मधील सेंच्युरी एंका या कंपनीत सुरक्षा अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीत आरोपी चव्हाण हा हाऊस किपींगचे काम करतो. त्याने कंपनीतून 33 हजार 800 रुपये किमतीची कॉपर आणि ऍल्युमिनिअमची वायर चोरून नेली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.