कंपनीच्या मोकळ्या जागेतून 10 लाखांचे साहित्य चोरले; एकास अटक

0
291

तळेगाव, दि. ७ (पीसीबी) – कंपनीच्या मोकळ्या जागेतून दहा लाख रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि. 4) मध्यरात्री तळेगाव एमआयडीसी मधील श्री समर्थ टेक प्रोसेस इंजिनिअरींग कंपनीच्या मोकळ्या जागेत घडली.

संजय धर्मा साह (वय 37, रा. मिंडेवाडी, ता. मावळ. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अरपित नारायण इंगळे (वय 37, रा. चऱ्होली, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीच्या मालकीच्या मोकळ्या जागेत काही कंपन्यांचे साहित्य ठेवले होते. त्यातील 10 लाख रुपये किमतीचे 20 टन मटेरीअल आरोपीने दोन टेम्पो मधून चोरून नेले. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करून त्याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.