पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कंपनीच्या बँक खात्याची डेबिटची एका दिवसाची लिमिट वाढवून अनोळखी व्यक्तीने कंपनीच्या खात्यातून 15 लाख रुपये ट्रान्सफर करत फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 30) आणि शुक्रवारी (दि. 1) घडला.
अविराज अशोक पाटसकर (वय 45, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. 2) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती आणि बँक खाते धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईची एमआयडीसी भोसरीमध्ये स्पार्क इंजिनिअर्स ही कंपनी आहे. कंपनीचे खाते भोसरी येथील आयडीबीआय बँकेत आहे. त्यांच्या बँक खात्याची दररोज डेबिटचे लिमिट दोन लाख रुपये आहे. अनोळखी इसमाने कंपनीच्या बँक खात्याला बेनिफिशरी अकाउंट म्हणून अॅड केले. अकाउंटचा कस्टमर आयडी आणि पासवर्ड हॅक करून बॅंक खात्याची एका दिवसाची डेबिट लिमिट वाढवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या आईच्या संमतीशिवाय गुरुवारी चार ट्रांजेक्शन द्वारे साडेसात लाख रुपये आणि शुक्रवारी दोन ट्रांजेक्शन द्वारे साडेसात लाख रुपये असे दोन दिवसात एकूण 15 लाख रुपये ट्रान्सफर करून फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.