कंपनीच्या गोपनीय माहितीचा अपहर केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

0
82

भोसरी, दि. 30 (पीसीबी) : कंपनीतील कर्मचाऱ्याने मध्येच काम सोडून कंपनीने त्याच्याकडे दिलेल्या गोपनीय माहितीचा अपहार केला. ही घटना 28 जुलै 2023 ते 4 सप्टेंबर 2023 या कालावधीत गुरुत्वा सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड गणेश नगर, भोसरी येथे घडली.

हर्षद शिवशंकर दवे (वय 45, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनप्रीत सिंग (रा. नवी दिल्ली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनप्रीत याच्याकडे फिर्यादी यांच्या कंपनीचे अकाउंट सांभाळण्याचे काम होते. दरम्यान त्याने मध्येच काम सोडून दिले. कंपनीने त्याच्याकडे दिलेल्या लॅपटॉप मध्ये कंपनीचा गोपनीय डेटा होता. त्याचा मनप्रीत याने अपहार केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.