कंपनीच्या गोडाऊनमधून 11 लाखांचे साहित्य चोरीला

0
329

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – कंपनीच्या गोडाऊनचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 11 लाख 16 हजार 180 रुपयांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) सायंकाळी साडेसहा ते शुक्रवारी (दि.19) सकाळी नऊ या कालावधीत एटीई वेल्डिंग इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमिशन प्रा ली, पिंपरी येथे घडली.

संजय प्रभाकर डेरे (वय 45, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीई वेल्डींग इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमेशन प्रा. ली. या कंपनीचे गोडाऊन कुलुप बंद असताना चोरट्यांनी मागच्या बाजूचे शटर उचकटून त्यातून 11 लाख 16 हजार 180 रुपये किंमतीच्या रोबोट वेल्डींग टॉर्चचा नोजल असेंबली मॉडेल या स्पेअर पार्टचे 78 नग चोरून नेले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.