कंपनीच्या उघड्या खिडकीवाटे पाऊण लाखाचा ऐवज चोरीला

0
182

चिखली, दि. २४ (पीसीबी) – कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या उघड्या खिडकीवाटे चोरट्यांनी 72 हजार रुपयांच्या कॉपरच्या पट्ट्या चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी पावरवस्ती, चिखली येथे उघडकीस आली.

राजेंद्र मुरलीधर काळे (वय 60, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे यांची पावरवस्ती येथे कंपनी आहे. गुरुवारी रात्री आठ ते शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या पाठीमागील बाजूला असलेल्या उघड्या खिडकीवाटे आत प्रवेश केला. कंपनीतून 72 हजार 117 रुपये किंमतीच्या 13 कॉपर पट्ट्या चोरून नेल्या. चिखली पोलीस तपास करीत आहेत.