कंपनीचे नाव, लोगो आणि जीएसटी नंबर वापरून फसवणूक

0
156

आळदी, दि. ११ (पीसीबी) – कंपनीचे नाव, लोगो आणि जीएसटी नंबर वापरून खोटे बिल बनावट कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना 9 फेब्रुवारी 2024 रोजी हरिओम इलेक्ट्रोनिक्स, आळंदी येथे घडली.

अविष्कार संदीप निकम (वय 18, रा. माण, ता. मुळशी), संदीप आकाराम निकम (वय 40, रा. माण, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रोहित खुशालराव पुरी (रा. आकुर्डी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीचे नाव, कंपनीचा लोगो आणि कंपनीचे जीएसटी नंबरचे खोटे बिल बनवले. ते बिल लॅपटॉप विक्रीसाठी वापरले. अशा प्रकारे कंपनी आणि ग्राहकांची फसवणूक करत असताना आढळून आले असल्याचे फिर्यादीत म्हटल आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.