कंपनीची २१ लाखांची फसवणूक

0
216

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) – कंपनीच्या मोबाईल मधील सीम कार्ड डीऍक्टिव्हेट करून मोबाईल मध्ये असलेल्या कंपनीच्या बँक खात्याची गोपनीय माहिती वापरून कंपनीच्या खात्यातून २१ लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २५ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत एमआयडीसी चिंचवड येथील फरफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस या कंपनीत घडला.

आनंद दिगंबर शुक्रे (वय ४२, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंताजूल इस्लाम मुल्ला (पुर्ण नाव माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुल्ला याने परफेक्ट लॅबोरेटरी सर्व्हिसेस कंपनीच्या नावावर असलेले सिमकार्ड डीऍक्टिव्हेट करण्याबाबत कंपनीला मेल पाठवला. सिमकार्ड बंद करून मोबाईल मध्ये असलेली कंपनीच्या बँक खात्याची माहिती वापरून मुल्ला याने कंपनीच्या खात्यातून दोन टप्प्यात २१ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.