कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी आयटी अभियंत्यांवर गुन्हा

0
219

पिंपरी, दि.१३(पीसीबी)- कंपनीने कामावरून काढून टाकल्यानंतर कंपनीने कामासाठी दिलेला लॅपटॉप व क्रेडिट कार्ड परत न करता त्याचा वापर करून कंपनीची तीन लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आयटी अभियंत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ७ एप्रिल २०२२ ते १२ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडिया प्रा ली, हिंजवडी येथे घडली.

सिद्धार्थ गायधर पाणीग्रही (वय ३५, रा. वाकड. मूळ रा. बेंगलोर) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी संदीप रघुनाथ पाटील (वय ३८, रा. पिंपळे गुरव, सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ हे इंडिया प्रा ली या कंपनीत काम करत असताना कंपनीकडून त्यांना लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड वापरासाठी देण्यात आले होते. दरम्यान, सिद्धार्थ यांना कंपनीने कामावरून काढून टाकले. त्यानंतर कंपनीने दिलेले लॅपटॉप आणि क्रेडिट कार्ड कंपनीला परत करणे आवश्यक असताना त्यांनी ते परत न करता त्याचा स्वतःसाठी वापर करून कंपनीची तीन लाख ८८ हजार ४०२ रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.