कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

0
228

हिंजवडी, दि. ५ (पीसीबी) – कंपनीकडून माल मागवून खरा माल काढून घेऊन कमी दर्जाचा माल परत पाठवून चुकीचा माल आला असल्याचे सांगून कंपनीची फसवणूक केल्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ऑगस्ट 2021 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत युथ बेव्हरेज फॅक्टरी, माण मुळशी येथे घडली.

याप्रकरणी रितेश नामदेव परदेशी (वय 41, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार झुबेर इनामदार उर्फ राहुल निर्मळे (रा. आकुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे माण मुळशी येथील युथ बेव्हरेज फॅक्टरी मध्ये काम करतात. आरोपीने फिर्यादी यांच्या कंपनीची प्रोटीन पावडरचे वेगवेगळी उत्पादने मागवली. ती उत्पादने घरी आल्यानंतर ते चुकीचे आले असल्याचे सांगून त्याच पॅकिंगमध्ये कमी दर्जाची उत्पादने भरून परत पाठवले. त्यानंतर कंपनीकडून मोफत उत्पादने मिळवली. यात कंपनीची 49 हजार 886 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.